१५ जून

परवा सकाळी आई सोबत फोन वर बोलत असताना शेजारचा ऋषी का रडतोय हे विचारल्यावर आई ने आठवण करून दिली की आज १५ जून. उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळा सुरु होणार पहिला दिवस. फोन ठेवला आणि सैरभैर झालेलं मन बेभान होऊन आयुष्याच्या मागील प्रवासाकडे पळू लागलं. मी ही स्वतःला न थांबवता त्याचा सोबत तितक्याच वेगाने  धावत सुटले. रस्त्यात २ वर्षाचा आनंदी वैवाहिक संसार दिसला, जवळपास ३. ५ वर्षाचा corporate life मधला एक एक दिवस ही दिसला . मधेच कुठेतरी मित्र मैत्री- मैत्रिणीं सोबत घालवलेले अमूल्य क्षण , unplanned trips, पावसात घेतलेली coffee आणि पाणीपुरी चे गाडे ही दिसले. अभियांत्रिकी चा ४ वर्षां मधील खडतर प्रवास,  submissions , exams , gathering , days बघत तर मन गालातच हसायला लागलं . पुढे junior college मध्ये कसून केलेला अभ्यास, रात्रीचे जागरण, cet साठी ५०-५० सोडवलेले sample papers, library मध्ये बसून उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्नही दिसली.

पुढे जाऊन मन जरा हळू झालं. कदाचित ते ज्याच्या शोधात होतं ते बालपण त्याला कुठे तरी दिसायला लागल होत.

बघता बघता मन जाऊन पोहोचलं प्राथमिक शाळेनंतर येणाऱ्या हायस्कूल च्या पहिल्या दिवसावर. इयत्ता ५वी . सकाळी ७ ची वेळ . नवीन शाळा, नवीन वर्ग, नवीन फळा, नवीन बाई, आधी सतरंजी वर मांडी घालून बसलेले पाय आज नवीन बाकावर बसून हवेत लोंबकळताना दिसत होते, काही नवीन आणि काही जुने चेहरे बघत असतानाच नवीन बाई वर्गावर आल्या. स्वतःची ओळख करून देऊन आमची सर्वांची ओळख करून घेऊ म्हणाल्या. त्या १०-१५ मिनिटांमध्ये मध्ये वर्गात असलेल्या ५०-६० मुली मैत्रिणी वाटू लागल्या. पुढे सर्वांची ओळख करून घेण्यात, आपल्या शेजारी कोण बसणार इथपासून ते सहामाही आणि वार्षिक परीक्षा ही झाली आणि वर्ष कस भुरकन पळालं कळलंच नाही.

पुन्हा एकदा उन्हाळ्याची सुट्टी, २-२.५ महिन्यात केलेली धमाल, result आणि पुढे आली ती लगेच ६वी . पुन्हा एकदा नवीन वर्ग, नवीन बाकी, नवीन फळा, नवीन बाई, काही नवीन आणि बरेच जुने चेहरे. ६वी संपली . ७वी scholarship मध्ये तर ८वी नव्यानेच आलेल्या सेमी-english चे डोके खाजवता- खाजवता संपली. ९वी देखील MTS आणि १०वी च्या तयारी मध्ये कुठे संपली कळालं देखील नाही. पुढे आली ती १०वी. आयुष्यातला पहिला महत्वाचा टप्पा . सराव परीक्षा , extra -classes , पहाटेचा अभ्यास , परत सराव परीक्षा आणि शेवटी बोर्डाची परीक्षा पण संपली.

दहावीच्या सत्कार समारंभामध्ये मनाला मी कुठेतरी कोपऱ्यात गुपचूप बसलेलं बघितल. मी college मध्ये जाण्यासाठी उत्सुक होते पण मन त्याच बालपण हरवतय म्हणून दुःखी होतं .

मनाच्या विरोधात पुढचं आयुष्य सुरु झाल आणि इथेवर येऊन पोहोचलं. आज शाळा सोडून १२ वर्षे झाली . खूप काही आठवणी पुसल्या गेल्या, खूप काही क्षण हरवले पण काही केल्या मन काही गोष्टी विसरल्या नाही जसं की, नवीन वर्ष सुरु होताना आई बाबां सोबत रविवारी केलेली सगळी नवीन खरेदी . दुपारी भूक लागली म्हणून एखाद्या हॉटेलात खाल्लेला वडा-रस्सा आणि पाव भाजी. तहान लागली म्हणून पिलेला तो थंडगार pineapple juice , रात्री अगदी थकलो असलो तरी नवीन घेतलेल्या वस्तू पुन्हा पुन्हा उघडून बघताना आणि नीट रचून ठेवण्यात जे समाधान होत ते परत मिळालं नाही. सकाळी परत उठून रात्री घेतलेला नवीन गणवेश, नवीन दप्तर , नवीन कंपास box , नवीन रैनकोट , नवीन वॉटरबॅग , घालून मिरवताना खूप मज्जा यायची. नवीन करकरीत वह्या आणि पुस्तकांचा तो मोहक सुगंध आजही मनाला भूल लावून जातो . आपल्या मैत्रिणीला आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या खोड्या सांगत असताना मधेच जोरात हसू येणे आणि बाई शिक्षा करतील म्हणून ते हसू  दाबणे , वर्गात गुपचूप डब्बा खाताना पडलेलं डब्याचं झाकण , वाढदिवसाच्या दिवशी वर्गात chocolate वाटताना आपल्या मैत्रिणीसाठी आधीच काढून ठेवलेली २ chocolate , पावसाच्या पाण्यात नवीन वह्यांचे पानं फाडून बनवून सोडलेल्या होड्या आणि raincoat असताना देखील मैत्रिणीसोबत सायकल वर पावसात भिजत जाण्याची मज्जा काही और च होती.

वय वाढलं, शरीर मोठं झालं पण कुठे तरी मन अजूनही तिथेच बागडताना दिसतंय , त्याच्या बालपणात !

-एक बालमन

balpan

PC: Image Courtesy – Google

 

Published by Ashudeep

I'm a free mind creative writer, a traveler, an artist and an Engineer.

2 thoughts on “१५ जून

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: